Top News

तळोदा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यावरून गुन्हा दाखल

शाळेच्या शिक्षक व संचालकाविरुद्ध विविध कलमांन्वये कारवाई; पोलिसांकडून तपास सुरू

तळोदा : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सादर करण्यात आलेल्या एका वादग्रस्त देखाव्यावरून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळोदा येथील नेमशुशिल विद्यामंदिरच्या शिक्षक व संचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

 3 ऑक्टोबर 2026 रोजी तळोदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, 18 सप्टेंबर 2026 रोजी तळोदा शहरातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोनार बाजार परिसरातून जात असताना नेमशुशिल विद्यामंदिरच्या वतीने श्रीगणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती.

👇व्हिडीओ लिंक वर क्लिक करून बघा 👇https://www.instagram.com/reel/Ddx0HuIEjnA/?stkn=YWpoaTYyeG1ndWxo

या मिरवणुकीत हिंदू महाराष्ट्राचे आराध्यदैवत व छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवराज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला होता. मात्र, या देखाव्यामध्ये शाळकरी मुलांना मुस्लिम पंथीयांचा वेश परिधान करून एका व्यक्तीची प्रतिकृती सादर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तक्रारीत पुढे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देण्यात आला असून, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तळोदा पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे.

तळोदा पोलिस ठाण्यात FIR क्रमांक 0483/2026 नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1)(a), 196(1)(b), 197(1)(c), 299, 302 तसेच 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश चंद्रकांत साळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित देखावा, सोशल मीडिया व्हिडिओ आणि तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज