Top News

भवरखेडेत गुरे चोरांचा डाव फसला! दोन गाईंची सुटका


बोलेरो गाडी सोडून चोरट्यांनी ठोकली धूम! धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे दि१६ रोजी २:३० ते ३ वाजेच्या सुमारास ध्यरात्रीच्या सुमारास गुरे चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी लोटन हिरमल पाटील यांच्या दोन गाई बोलेरो गाडीत टाकून चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला असून, चोरटे बोलेरो गाडी घटनास्थळी सोडून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भवरखेडे येथे मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गुरे चोरीची ही घटना घडली. चोरट्यांनी शेतकरी लोटन हिरमल पाटील यांच्या दोन गाई चोरण्याच्या उद्देशाने बोलेरो गाडीत टाकल्या होत्या.मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना आपला डाव साधता आला नाही. त्यामुळे त्यांनी बोलेरो गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला.चोरीच्या प्रयत्नात बोलेरो गाडीत टाकलेल्या दोन्ही गाईंची सुटका करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान टळले. मात्र, मध्यरात्री गावात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जनावरांना लक्ष्य केले जात असल्याने पशुपालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी संबंधित शेतकरी लोटन हिरमल पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद रवींद्र पाटील करीत


आहेत. घटनास्थळी सोडून दिलेल्या बोलेरो गाडीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज