Top News

साळवे इंग्रजी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!

सेवा संकल्प अभियानातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन

धरणगाव प्रतिनिधी : साळवे, ता. धरणगाव येथील साळवे इंग्रजी विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी सेवा संकल्प अभियानातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. मोरे होते.

कार्यक्रमात श्रीमती गुणवंती पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि राष्ट्रसेवेच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच सौ. आर. पी. नेहेते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देताना वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. बी. आर. बोरोले यांनी केले. डॉ. कलाम यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज