Top News

धरणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची फी सरसकट माफ करा - सहारा बहुद्देशीय संस्थेची मागणी


धरणगाव प्रतिनिधी :- चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये धरणगाव तालुका महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. सलग दोन वर्षे पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी सरसकट माफ करावी, अशी मागणी सहारा बहुद्देशीय संस्था, धरणगाव च्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण विठोबा माळी, उपाध्यक्ष श्री विनोद सुरेश रोकडे आणि सचिव श्री रमेश जानकीराम चव्हाण डॉ गणेश माळी रणजित सिकरवार, पवन माळी ,विजय चव्हाण , दिपक बाविस्कर, सुबोध खैरनार , निखिल साळुंखे ,यांच्या उपस्थितीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव चे उपप्राचार्य डॉ सौ आर ,पी ,चौधरी मॅडम, लिपिक परेश जाधव ,यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,

महाराष्ट्र शासनाच्या संकटग्रस्त / दुष्काळग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफी देण्याबाबतची तरतूद लागू आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार फी माफीचा लाभ देण्यात यावा. अनेक पालकांचे उत्पन्न कमी होऊन त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी भरणे शक्य होत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे.

तरी कृपया सदर बाब विचारात घेऊन पात्र विद्यार्थ्यांना फी माफी लागू करून त्यांना शिक्षणापासून वंचित राहू देऊ नये, यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज