जळगाव : हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या स्थापना दिनानिमित्त जळगाव शहरातील सुभाष चौक येथील भवानी माता मंदिरात हिंदू बांधव एकत्र आले. यावेळी श्री भवानी मातेला श्रीफळ अर्पण करून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली तसेच प्रतिज्ञा घेण्यात आली.
हिंदू जनजागृती समितीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात हिंदू बांधवांनी धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. देवी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करून समाजात धार्मिक जागृती वाढावी, हिंदू संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे आणि राष्ट्रहिताच्या कार्याला बळ मिळावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हिंदू जनजागृती समितीच्या माहितीनुसार, समितीच्या माध्यमातून हिंदू धर्माविषयी जागृती, विविध सामाजिक उपक्रम, आंदोलने, अधिवेशने आणि हिंदू संघटनांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केले जातात. स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, जळगावमध्येही धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला.

إرسال تعليق