Top News

सुप्रसिद्ध लेखक सुरज सुधाकरराव पवार यांचा पुसद येथे जाहीर सत्कार संपन्न.

पुसद (जि. यवतमाळ) - येथे आयोजित राज्यस्तरीय बंजारा समाज भजन मंडळ कवी संमेलनात सुप्रसिद्ध लेखक याडीकार पंजाब चव्हाण यांच्या हस्ते लेखक, कवी सुरज सुधाकरराव पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर आधारित 'वसंत गीतांजली' हा काव्यसंग्रह लिहून व महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या हस्ते मुंबई येथे प्रकाशित करून भावी पिढीकरिता प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

सुरज पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित वसंत गीतांजली काव्य संग्रहाचे लेखक, कवी, समाज सेवक, पत्रकार, सनातन सारथी न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य म्हणून कार्यरत आहेत.

या प्रसंगी डॉ. सुरेश राठोड, पोहरादेवीचे आमदार बाबुसिंग महाराज, प्रा. वसंत राठोड, संतोष राठोड समाज सेवक वालतूर, शेतकरी नेते मनीष जाधव, राजू महाराज पेढी सुधाकर नगर, राजू राठोड पत्रकार व प्रा. इंजि. प्रवीण पवार नागपूर हे विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित होते. तसेच राज्यातील प्रबोधनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्काराबद्दल सुरज पवार यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज