Top News

चंद्रपुर जिल्ह्यातील मासेमार संस्थांना दुष्काळी आर्थिक मदत जाहिर करा :-यशवंत दिघोरे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर.

 


ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी:- संजय बागडे 

चंद्रपूर जिल्ह्यात मासेमारांच्या १६५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थांचे अंदाजे २७००० सभासद व इतर मासेमार कुटुंबाचे आर्थीक व्यवहाराचे साधन लिह्यातील ९४ पाटबंधारे तलाव व ११०० चे वर जिल्हा परिषदचे मामा तलाव तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदी नाल्यातील मासेमारी करुन कुटुंबाचे उदरनिर्वाह करणे यावर अवलंबून आहे. मागील मामा तलावाची कामे करण्याकरीता बऱ्याचश्या जिल्हा परिषद तलावातील पाणी सोडून कामे करण्यात आली. त्यामुळे तलावात पाणीसाठा अत्यल्प होता.

यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे, तलाव, जलाशये व नदीनाल्यामध्ये पाणी साठा कमी आहे. यावर्षी पडलेला कमी पाऊस तसेच शेतीसाठी तलावातील पाण्याचा वापर शेतकरी करीत असल्यामुळे यावर्षी तलावात मृत साठा सुध्दा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मासेमार सहारी संस्थानी जून, जुलै महिन्यात आपल्याकडे ठेक्याने असलेल्या तलावात मत्स्यबीजाचे संचयण केले आहे. अपुऱ्या पावसाने उद्भणाऱ्या परिस्थीतीने मत्स्यबाजीची वाढ होणार नाही व त्यामुळे मत्स्य संस्थांनी मत्स्यबीज खरेदी व इतर झालेला खर्च सुध्दा मासेमारीतून निघणार नाही. अशा परिस्थितीत संस्थांच्य सभासदांना मासेमारीतून रोजगार देवू शकणार नाही व त्यामुळे सभासद तसेच संस्थना आर्थीक संकटाचा सामना करावा लागणार आहे व मासेमारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थीक मदत देण्याचे शासनाकडून ठरविण्यात आले आहे. मत्स्यव्यवसाय हा पुर्णतः पाण्यावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. तलावात अत्यल्प पाणी असल्याने मत्स्यव्यवसाय डबघाईस आलेला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करुन मासेमार सहकारी संस्था मासेमार यांना शासनाकडून आर्थीक मदत करण्यात यावी अशी मागणी यादव मेश्राम अध्यक्ष, जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ, चंद्रपूर व यशवंत दिघोरे, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर व मत्स्य संस्थांचे संचालक मंडळ यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज