उरुळी कांचन,(प्रतिनिधी) :-स्वर कला संघ, गोवा समाज कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील शिवराज साने यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. आमदार गोविंद गावडे, आमदार पेमेंद्र शेट तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या हस्ते शिवराज साने यांस पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला, सामाजिक बांधिलकी तसेच आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारामुळे उरुळी कांचनसह हवेली तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवराज साने यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे. यावेळी आयोजक डॉ. बाळकृष्ण खरात, फिरोज शेख संस्थापक व्यवसाय संचालक मल्टी जुनियर प्रोफेशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे व लंडन करिअर मार्गदर्शक माणदेशी, उपसंपादक राहुल खरात, संदीप रासकर, सरपंच राहुल चाबुकस्वार, रघुनाथराव ढोक, फुले शाहू आंबेडकर एज्युकेशन ट्रस्ट राखी रासकर, सम्राट बहुत देशाच्या जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष रेखा शिवराज साने, कु. पूजा कोटी, सुरेखा यश बेहरा, मिलिंद सरवदे उपस्थित मान्यवर होते.

إرسال تعليق