Top News

सम्राट अशोकाच्या ८४ हजार स्तुपापैकी उदापुरात एक स्तुप नक्कीच सापडेल.

शासनाने संशोधन करावे.भन्ते सुमानंद 

चंद्रपूर :- (संजय बागडे ९१६८९८६३७८)

सम्राट अशोक राजाने संपूर्ण देशात बांधलेल्या ८४ हजार स्तुपापैकी एक स्तुप उदापुरात असून या उदापुरातील भव्य स्तुप शासनाने संशोधन करून उत्खनन करावे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बुद्धिष्ठ इंटरनॉशनल संघटना नवि दिल्ली चे भदन्त सुमानंद यांनी उदापुर येथील पार पडलेल्या पौणिमा वंदन व परिक्रमा कार्यक्रमांत केले.  

       चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर गावात सम्राट अशोक कालीन स्तूपाचे अवशेष सापडले त्यामुळे दि. २६ सप्टेंबर बौद्ध पौर्णिमा व परिक्रमा कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक सत्यकी खोजकार सत्यशोधक नागपित्र धर्मेश पाटिल नागपूर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदन्त सुमानंद धम्मबंधु प्रा. मुनिश्वर बोरकर डॉ. गोपाल रायपुरे डॉ. प्रेमलाल मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे आरमोरी शुशीला भगत आलापल्ली दशरथ साखरे चंक्रधर मेश्राम ससैदलाचे अभिमन्यु बन्सोड किशोर पिल्लावान उदापुर संघमित्रा राजवाडे आदि लाभले होते.

              सम्राट अशोक स्तुप स्थळी बुद्धवंदना घेण्यात आली व समता सैनिक दलाच्या कार्यकर्तांनी गावात धम्मरॉली काढली आयोजक धर्मेश पाटिल यांनी उदापुरातील स्तुपाविषयी विश्रृत माहिती दिली याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर डॉ. प्रेमलाल मेश्राम डॉ. गोपाल रायपुरे , प्रज्ञा निमगडे , किशोर पिल्लावानआदि चे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमास चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते व धन्मबंधु बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज