मूडझा येथील ग्राम वासियांना तात्काळ मिळवून दिला दिलासा.
ब्रह्मपुरी प्रतिनिधी संजय बागडे : मूडझा येथील नागरिकांना स्मार्ट मीटरमुळे भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. तनय दादा देशकर यांनी गांगलवाडी येथील महावितरण विभागाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली.
यावेळी मूडझा येथील नागरिकांच्या स्मार्ट मीटर संदर्भातील अडचणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या, सोबतच तातडीने योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तनय देशकर यांनी पाठपुरावा केला. नागरिकांच्या वीज बिल विषयक समस्या सोडविण्यासाठी महावितरण प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कारवाई केली.
तनय दादा देशकर यांच्या पाठपुराव्यामुळे मूडझा ग्राम वासियांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांची आर्थिक बचत झाली आहे.
إرسال تعليق