हरियाणा चॅम्पियन मलंग रौरा ठाकूर यांच्यावर मात; हजारो कुस्तीप्रेमींची उपस्थिती
धरणगाव, दि. ९ सप्टेंबर : श्री व्यायाम प्रसारक मंडळ, धरणगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘कुस्ती का महासंग्राम’ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मरीमाता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या कुस्ती महासंग्रामाला हजारो कुस्तीप्रेमींनी उपस्थिती लावत मल्लांच्या चित्तथरारक डावपेचांचा आनंद घेतला.
स्पर्धेतील मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘खान्देश केसरी’ किताबासाठी हरियाणा चॅम्पियन पै. मलंग रौरा ठाकूर आणि उपमहाराष्ट्र केसरी पै. भारत मदने (सातारा) यांच्यात अटीतटीची कुस्ती झाली. दोन्ही मल्लांनी दमदार डावपेच करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. अखेर पै. भारत मदने यांनी बाजी मारत ‘खान्देश केसरी’ किताबावर आपले नाव कोरले.
याशिवाय मुसा पहेलवान (इंदोर) विरुद्ध सुनील जाधव (सोलापूर) यांच्यात झालेल्या कुस्तीत सुनील जाधव विजयी झाले. आकाश करे विरुद्ध सैप अली पंजाबी यांच्या सामन्यात सैप अली पंजाबी यांनी विजय मिळवला. तसेच सुनील पहेलवान (हरियाणा) विरुद्ध इम्रान पहेलवान (संभाजीनगर) यांच्यातील कुस्तीत सुनील पहेलवान (हरियाणा) विजयी झाले.
कार्यक्रमात धरणगावसह विविध जिल्ह्यांतील नामांकित मल्लांच्या अनेक छोट्या-मोठ्या कुस्त्या रंगल्या. लहान गटातील मल्लांनीही आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. मल्लांच्या दमदार डावपेचांना प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबरावजी पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, सुभाष आबा महावीर फायबर, दिनेश चौधरी, नगरसेवक हेमंत भाऊ महाजन, नगरसेवक परमेश्वर भाऊ महाजन, नगरसेवक पप्पू भाऊ भावे, नगरसेवक विलास महाजन, वाल्मिक पाटील, धानोरे येथील कॉन्ट्रॅक्टर आबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार व हेरिटेज मॉर्निंग ग्रुपचे प्रमुख प्रा. बी. एन. चौधरी, नगरसेवक मोनुभाऊ सिरसाठ, भरत भाई असर, श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक सुरेश नाना चौधरी, गुलाबराव वाघ, जीवन आप्पा बयस, ज्ञानेश्वर महाजन, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग महाजन, महेंद्र बापू महाजन, राजेंद्र रुंझु गायकवाड सर, प्रतिक जैन, पी.आय. गायकवाड, डीवायएसपी सुनील पाटील (चोपडा), रोशन राजपूत (नगरपालिका, धरणगाव), सागर कोल्हे (BDO) तसेच आरोग्य निरीक्षक संतोष बिरहाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मल्लांचा सत्कार करण्यात आला.
पै. भानुदास आप्पा विसावे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन
या भव्य कुस्ती महासंग्रामाचे आयोजन ‘धरणगावची शान, आमचा अध्यक्ष आमचा अभिमान’ पै. भानुदास आप्पा विसावे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पै. विसावे हे महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त असून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मंगलदास भाटिया, सचिव प्रशांत वाणी, विलास नाना येवले, खजिनदार कमलेश तिवारी, तसेच संचालक अॅड. संजय महाजन, देवा महाजन, प्रकाश पाटील, शरद भोई, किशोर वाणी, किरण वाणी, दिनकर पाटील, किशोर भावे, नारायण महाजन, गुरु पहेलवान, गोपाल पाटील, किशोर महाजन, रावा भोई, बाळकृष्ण येवले, राजू न्हायदे, अरुण महाले, अप्पी पहेलवान, नंदू करोसिया, किरण सोनवणी यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी, संचालक व सदस्यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق