Top News

महागाव शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव; फवारणी करण्याची नागरिकांची मागणी


महागाव (यवतमाळ) प्रतिनिधी- श्री सुरज पवार , दि. २८ सप्टेंबर २०२६ : महागाव शहरातील विविध भागांमध्ये सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले असून, विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील नाले, साचलेले पाणी तसेच अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने डास प्रतिबंधक औषधांची फॉगिंग फवारणी तसेच आवश्यक ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील नाले व परिसराची नियमित स्वच्छता करून डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत आणि नागरिकांना या समस्येतून लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली.

यासंदर्भात अविनाश नरवाडे, स्वप्नील नरवाडे आणि विवेक नरवाडे यांनी महागाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज