प्रतिनिधी सुरज पवार
मुंबई : उपवर्गीकरण निर्धारासाठी सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. "जय लहुजी बोलो! मंत्रालय चलो!" या घोषणेखाली हा महामोर्चा निघणार आहे.
सकल मातंग समाजाच्या हक्कांसाठी आणि उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला असून, या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक : २९ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : आझाद मैदान, मुंबई
आपल्या हक्कासाठी आपल्या उपस्थितीची गरज आहे, असे आवाहन आयोजक *मा. श्री कृष्णा कांताराम पिंगळे* यांनी केले आहे.
या मोर्चासाठी संकल्प मातंग समाज संघटनेच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून, राज्यभरातून हजारो समाज बांधव मुंबईत दाखल होणार आहे.

إرسال تعليق