![]() |
| भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. तनय दादा देशकर यांनी तात्काळ दवाखान्यात दिली भेट; उपचार व शासकीय मदतीसाठी प्रशासनाशी साधला संवाद. कुटुंबियांना जी दिला धीर. |
प्रतिनिधी - संजय बागडे
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बरडकीन्ही येथे आज संध्याकाळी वीज पडून ६ महिला जखमी झाल्या. त्यातील एका जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. तनय दादा देशकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची व तिच्या कुटुंबियांची आस्थेने भेट घेत जखमी मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी तनय दादा देशकर यांनी डॉक्टरांशी चर्चा करून मुलीच्या उपचाराची माहिती घेतली. तसेच तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
जखमी मुलीला शासनाकडून आवश्यक ती मदत मिळावी, यासाठी त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून मदतीच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली. यासंदर्भात आवश्यक तो पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी तालुका प्रशासनाचे अधिकारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. साकेतजी भानारकर, बरडकिन्हीचे पोलीस पाटील श्री. विक्कीजी निकुरे, भाजपाचे श्री. कैलास बोंडगुलवार, श्री. शिवम दोनाडकर व कुटुंबीय उपस्थित होते.


إرسال تعليق