महागाव / प्रतिनिधी- श्री सुरज पवार
दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी महागाव येथे गोर बंजारा समाजातील परंपरागत तांडा नेतृत्व करणाऱ्या नायक-कारभारी यांचे भव्य चर्चा सत्र पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय हिरासिंग मानसिंग चव्हाण नाईक, महागाव हे होते, तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन जगदीश महाराज पिंपरीकर यांनी केले.
तांडा-वाडीतून स्वतंत्र न्याय प्रणाली चालवत आलेला तांडा, तांडा नशाब, तांडा संस्कृती, तांडा त्योहार यांचा वारसा जपणारे नायक-कारभारी आजही आपल्या सईनुसार तांड्या-वाडीमध्ये निस्पृह सेवा करत आहेत. मात्र शासनाच्या छोट्याशा कार्यक्रमात केवळ पुरस्कार देऊन मोकळे केले जाते. परंपरागत चालत आलेले, सतत समाजाचे नेतृत्व करणारे नायक-कारभारी आजही शासकीय व्यवस्थेपासून दूर आहेत. त्याच नायक-कारभाऱ्याला शासनाने सन्मानाने मोजमाप करावे व शासकीय लाभ देऊन गौरव करावा, हीच समाजाची अपेक्षा आहे. शासनापर्यंत आपली हाक पोहोचवण्यासाठी ही एक चळवळ असून या चर्चा सत्रात महागाव तालुक्यातील ७८ तांड्यातील नायक-कारभारी सहभागी झाले होते.
यावेळी जगदीश महाराज पिंपरीकर यांनी नायक-कारभारी यांची व्यथा मांडली, हिरासिंग चव्हाण नाईक यांनी तांडा संस्कृतीबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी लेखक, पत्रकार, समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी गोर समाजातील नायक-कारभारी परंपरा ही आपली न्याय व्यवस्था असून तिला शासकीय मान्यता मिळावी, तसेच तांडा प्रमुखांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी उपस्थित असलेले नायक-कारभारी:
१. हिरासिंग मानसिंग चव्हाण - महागाव
२. विनोद विराजी राठोड - कोंढाळी
३. रामलाल गुरा चव्हाण
४. उत्तम सखाराम राठोड - काबेहळ
५. संजय रामचंद्र पवार
६. जगदीश महाराज पिंपरीकर - पिंपरी
७. विलास बळीराम राठोड - कोहारी
८. मधुकर मोतीराम चव्हाण
९. मारोती खवडू राम राठोड
१०. गोविंद बाबाराव राठोड
११. बाबूलाल मानिराम राठोड - महागाव
१२. मनोज देवासींग राठोड - मुडाणा
१३. गजानन रामा चव्हाण
१४. रोमा नाईक बाई चव्हाण - बेलदरी
१५. राजु सिंग काळूराम राठोड - उमरा बाजार / सुहागनगर
१६. उल्हास गोपा चव्हाण
१७. सुरज सुधाकरराव पवार - महागाव
यावेळी सर्व तांड्यातील नायक-कारभारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.

إرسال تعليق