![]() |
| धरणगाव-अमळनेर प्रवाशांना मोठा दिलासा; खान्देशातील प्रवाशांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन |
धरणगाव : धरणगाव व अमळनेर परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गाडी क्र. 04156/04155 उधना–सुभेदारगंज स्पेशल एक्सप्रेसला १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दर शुक्रवारी धावणारी 04156 उधना–सुभेदारगंज एक्सप्रेस अमळनेर येथे रात्री ८ वाजता, तर धरणगाव येथे रात्री ८.२५ वाजता थांबते.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 04155 सुभेदारगंज–उधना स्पेशल एक्सप्रेस दर मंगळवारी धावते. ही गाडी धरणगाव येथे सकाळी ८.५३ वाजता, तर अमळनेर येथे सकाळी ९.१५ वाजता थांबते.
या रेल्वेमुळे भुसावळ, इटारसी, राणी कमलापती तसेच पुढील मार्गावरील प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे धरणगाव, अमळनेर व परिसरातील प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन खान्देशच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ, ZRUCC सदस्य प्रतीक जैन तसेच खान्देशातील प्रवासी संघटनांकडून करण्यात आले आहे.

إرسال تعليق