Top News

धरणगावात मरीआई यात्रेला उत्साहात प्रारंभ; श्रावणातील चारही मंगळवारी रंगणार कुस्त्यांची भव्य दंगल


मरीआईची पूजा व आरती करण्याचा मान धरणगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई सुरेश चौधरी यांना देण्यात आला.

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव शहराची ग्रामदेवता श्री मरीआई देवीच्या यात्रेस श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त मरीआई मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली. मरीआईची पूजा व आरती करण्याचा मान धरणगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई सुरेश नाना चौधरी यांना देण्यात आला.

नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांच्या हस्ते मरीआईची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मरीआई संस्थान मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेच्या प्रारंभामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

श्रावणातील चारही मंगळवारी कुस्त्यांचा थरार

मरीआई यात्रेचे आणखी एक आकर्षण असलेल्या कुस्त्यांच्या भव्य दंगलीलाही आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. श्रावण महिन्यातील चारही मंगळवारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध भागांतून नामांकित मल्ल या कुस्ती दंगलीत सहभागी होणार असून, कुस्तीप्रेमींना चारही मंगळवारी चुरशीच्या लढतींचा थरार अनुभवता येणार आहे.

धरणगावातील मरीआई यात्रेला धार्मिक परंपरेसोबतच कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली असून, यंदाही यात्रेनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. कुस्त्यांच्या दंगलीसाठी कुस्तीप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मरीआई संस्थान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज