Top News

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त फोटोग्राफर बांधवांचा सन्मान; कॅमेरा पूजन उत्साहात

 

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत फोटोग्राफर

धरणगाव : जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त धरणगाव शहरातील फोटोग्राफर बांधवांच्या वतीने कॅमेरा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या उपस्थितीत कॅमेरा पूजन करण्यात आले.


पुजन करतांना नगराध्यक्षा सौ लिलाबाई चौधरी 

फोटोग्राफीच्या माध्यमातून समाजातील विविध घटना, प्रसंग, संस्कृती आणि आठवणी जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फोटोग्राफर करीत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करताना नगराध्यक्षा सौ. लिलाबाई सुरेशनाना चौधरी यांनी उपस्थित सर्व फोटोग्राफर बांधवांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




यावेळी शहरातील सर्व फोटोग्राफर बांधव उपस्थित होते. कॅमेरा पूजनानंतर परस्परांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज