Top News

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले १९ व २० ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

यवतमाळ : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे दि. १९ व २० ऑगस्ट २०२६ रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रम, शासकीय बैठक, नेत्र रुग्णालयाच्या थिएटरचे उद्घाटन, पत्रकार परिषद तसेच नागरिक व स्थानिक नेत्यांशी संवादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता उमरखेड येथील जी.एस. सारडा राजस्थानी भवन येथे आयोजित सत्कार समारंभास नामदार आठवले उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री ८.१५ वाजता कैलासवासी गोविंद मेश्राम, चंद्रमणी बुद्ध विहार, नेताजीनगर यांच्या निवासस्थानी सांत्वन भेट देतील. त्यानंतर ते यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.

दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या विविध योजनांबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी १२ वाजता वाघापूर येथील श्री सत्यसाई संजीवन नेत्र हॉस्पिटलमधील थिएटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १ वाजता कॉटन मार्केट चौक, धामणगाव रोड, यवतमाळ येथील राधा मंगल कलर्स हॉटेल येथे पत्रकार परिषद होणार आहे.

दुपारी ३ वाजता याच ठिकाणी जनतेशी संवाद कार्यक्रम, तर सायंकाळी ५ वाजता स्थानिक नेत्यांसोबत चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर नामदार रामदास आठवले हे नागपूरकडे प्रयाण करतील.

प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार

सनातन सारथी न्यूज यूट्यूब चॅनेल

मो. ७३५०२३६१२१

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज