Top News

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात

तिरंगा रॅली, चित्रकला, तिरंगा राखी व तिरंगा रांगोळी उपक्रमांत ४०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान, देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या शासकीय उपक्रमांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रम उत्साहात पार पडले.

यामध्ये ३०० फूट लांबीची भव्य तिरंगा रॅली, तिरंगा चित्रकला, तिरंगा राखी बनविणे आणि तिरंगा रांगोळी या उपक्रमांचा समावेश होता. या विविध उपक्रमांमध्ये सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जाणीवेचा प्रभावी संदेश दिला.

तिरंगा रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे एन.सी.सी. पथकातील तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ३०० फूट लांबीचा भव्य तिरंगा ध्वज सन्मानाने सादर केला. या रॅलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत देशभक्तीचा उत्साह निर्माण केला.



‘तिरंगा चित्रकला’ उपक्रमात १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तिरंगा ध्वजाची आकर्षक चित्रे साकारली. ‘तिरंगा राखी’ उपक्रमात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध टाकाऊ व घरगुती साहित्याचा कल्पकतेने वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. यामध्ये तांदूळ, डाळ, पिस्त्याची साल, कागद, रंगीत दोरे, पाईप क्लिनर, इयर बड्स, स्पंज, लोकर, काडीपेटीतील काड्या, रंगीत फुले, टिकली, मणी व कुंदन लेस आदी साहित्याचा वापर करण्यात आला.




तसेच ‘तिरंगा रांगोळी’ उपक्रमात २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुबक व आकर्षक तिरंगा रांगोळ्या साकारल्या.

या हस्तकला व देशभक्तीपर उपक्रमांचा शुभारंभ शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका रमा तारे आणि पर्यवेक्षक जगदीश साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी एन.सी.सी. विभाग प्रमुख श्रीकांत घुगे, कविता कुऱ्हाडे, नीलिमा सपकाळे, प्रेम सारस्वत, योगिता महाजन, योगिता तडवी, वृषाली पाटील, सुवर्ण वंजारी, रुपाली महाजन, यामिनी चौधरी, मनिषा पवार तसेच क्रीडा विभाग प्रमुख उल्हास ठाकरे आणि पद्मजा जोशी आदी मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. सहभागी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व बलिदान, राष्ट्रप्रेम तसेच शिस्तीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

हे सर्व देशभक्तीपर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज