![]() |
पत्रकार सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडियाकडून तीव्र निषेध |
पत्रकार सुशील थोरात यांच्यावर पाइपलाइन रोड येथे झालेल्या हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. या हल्ल्यात थोरात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून, पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पत्रकारावर हल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
“पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या हल्ल्याचा जाब आम्ही विचारणार असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, उपअधीक्षक टिपरसे यांच्यासह पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील पार्श्वभूमी तपासून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाने केली आहे.
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात व्हॉईस ऑफ मीडिया ठामपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणार असून, या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

إرسال تعليق