धरणगाव : इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे सचिव सी.के. पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्या सुरेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधीजींचे सत्य, अहिंसा व स्वच्छतेचे विचार तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास उपप्राचार्य ए.एस. पाटील, आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील व पर्यवेक्षिका भारती पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका रूपाली पाटील व ज्योती चौधरी यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक डी.एन. पाटील यांनी आभार मानले.

إرسال تعليق