Top News

शेठ ला. ना. सा. विद्यालयात गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियान


अहिंसा-सद्भावना शांती यात्रा, जयंती कार्यक्रम आणि ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम उत्साहात

जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासन निर्देशित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी अहिंसा-सद्भावना शांती यात्रा, जयंती कार्यक्रम तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित अहिंसा-सद्भावना शांती यात्रेत विद्यालयाचे एनसीसी पथक व मार्गदर्शक शिक्षक श्रीकांत घुगे सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या जयंती कार्यक्रमात मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखेडे, पर्यवेक्षक रमा तारे, जगदीश साळुंखे तसेच गांधीजी व शास्त्रीजींची वेशभूषा केलेले विद्यार्थी जय सोनवणे व कुणाल साखरे यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत भाषणे आणि कवितांद्वारे गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनकार्याची माहिती दिली. सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव, मानवता, स्वावलंबन, देशनिष्ठा, प्रामाणिकपणा व साधेपणा या मूल्यांचा संदेश यावेळी देण्यात आला. शिक्षक पद्मजा जोशी व पांडुरंग सोनवणे यांनी ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले.





उपमुख्याध्यापक संजय वानखेडे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत शाळेतील वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा व परिसराची स्वच्छता करण्यात आली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अभियान यशस्वी केले. सूत्रसंचालन प्रथमेश माळी तर आभार कुणाल साखरे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज