Top News

ताफा थांबला... जवानांसाठी मंत्री गुलाबराव पाटील रस्त्यावर उतरले


नक्षल बंदोबस्तासाठी गडचिरोलीकडे निघालेल्या SRPF जवानांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

पाळधी/जळगाव,  : नक्षल बंदोबस्तासाठी गडचिरोलीकडे रवाना होत असलेल्या SRPF जवानांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला ताफा थांबवून जवानांची भेट घेतली.

पाळधी येथून धरणगावकडे जात असताना SRPF जवानांचा ताफा जात असल्याचे लक्षात येताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपला ताफा थांबवला. त्यांनी जवानांशी संवाद साधत त्यांना नक्षलविरोधी बंदोबस्तासाठी शुभेच्छा दिल्या.


देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात रवाना होणाऱ्या जवानांच्या धैर्याचे आणि कर्तव्यनिष्ठेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी जवानांचा उत्साह वाढविताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी अचानक ताफा थांबवून जवानांची भेट घेतल्याने उपस्थितांमध्येही हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज