Top News

पोहरादेवी येथे माजी महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा संस्थानतर्फे सत्कार

◾प्रतिनिधी - श्री सुरज पवार 

पोहरादेवी : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी आज, शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी (गड) येथील तीर्थक्षेत्राला भेट दिली. नवरात्रोत्सवानिमित्त त्यांनी माता जगदंबा देवी, संत सेवालाल महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज आणि संत रामराव बापू यांचे दर्शन घेतले.

यावेळी श्री जगदंबा देवी व दानशूर संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ संस्थानतर्फे धर्मगुरू महंत सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या पत्नी सौ. अनामिका सुनील महाराज यांच्या शुभहस्ते रूपालीताई चाकणकर यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्यांना जगदंबा मातेची साडी-चोळी अर्पण करण्यात आली. तसेच बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीनुसार घोरपट्टा व कवडीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रूपालीताई यांच्यासोबत त्यांचे बंधू तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सभापती बंडूजी खांदवे व त्यांचे चिरंजीव उपस्थित होते. याशिवाय पोहरादेवी येथील महंत अनिल महाराज, महंत केशव महाराज, सुधीर महाराज, माणिक रामसिंग महाराज, रामपाल महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, महाराज आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बळीराम जाधव (वसंत नगर), संजय परसराम महाराज, कैलाश महाराज, अरविंद चव्हाण (सावली), रमेश जाधव (माऊली), रमेश नाईक, नामदेव जाधव, बलदेव जाधव (खेडी), कैलास आडे (उपसरपंच, तुळशीनगर), अनिल राठोड (वनविभाग), गजानन शिवा राठोड, डॉ. सुरेश जाधव, संतोष महाराज, विनोद महाराज, अक्षय शेखर राठोड, अजय महाराज, प्रफुल चव्हाण, विशाल जाधव (देवठाणा), करण महाराज, आर्या महाराज, विक्रम जाधव, धनराज (गोलू) महाराज, ज्ञानेश्वर राठोड (हळदा), शाम राठोड, हिरा जाधव, संजय रणमले, सुदेश राठोड, दिलीप पवार, रणवीर पवार, अक्कू महाराज आणि चिकू राठोड यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.

धार्मिक श्रद्धा, बंजारा समाजाच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या भेटीप्रसंगी संस्थानतर्फे रूपालीताई चाकणकर यांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करण्यात आला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज