धरणगाव : श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात ‘पाणी वाचवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
विद्यालयाचे उपशिक्षक ए. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ उघडे न ठेवणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे, यांसारख्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, एस. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. आर. चव्हाण यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख सागर पाटील यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची आणि जलसंवर्धनाचा संदेश घरोघरी पोहोचवण्याची प्रतिज्ञा घेतली.

إرسال تعليق