पोलीस स्टेशन महागाव
पोलीस स्टेशन महागाव शहर व ग्रामीण हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, पोलीस स्टेशन महागांव परिसरात कोणतीही व्यक्ती गांजा, एमडी किंवा इतर अमली पदार्थांची विक्री, खरेदी, वाहतूक अथवा सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन महागाव येथे द्यावी.
अमली पदार्थांच्या सेवनामुळे युवक व विद्यार्थ्यांच्या जीवनावर गंभीर परिणाम होऊन सामाजिक वातावरणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेची आवश्यक ती पूर्ण काळजी घेण्यात येईल.
अमली पदार्थांच्या गैरप्रकाराबाबत माहिती असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
मोबाईल क्रमांक : 8766065335
नागरिकांनी कोणत्याही भीती अथवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांच्या गैरप्रकाराची माहिती पोलिसांना द्यावी व समाजातील युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
إرسال تعليق