Top News

मानाच्या मारुतीचे वाहनास सर्वाधिक दोन लाख एक हजार रुपयांची बोली...!


जोडी लिलाव उत्साहात संपन्न.

धरणगाव -सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळाचा जाहीर बैलजोडीचा लिलाव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंदिराच्या पटांगणावर झालेल्या या कार्यक्रमात शहर परिसरातील असंख्य भाविक भक्त सहभागी झाले होते.

प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष डी.आर. पाटील यांनी प्रास्ताविकात वाहन लिलाव प्रक्रियेची माहिती विषद केली व आगामी काळात होणारा रथ व वाहन उत्सव हा आपल्या गावाचा असून तरी सर्वांनी शांततेत साजरा करावा असे आवाहन केले. नवनियुक्त पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी भाविक भक्तांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन केले. मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. नंतर लिलाव प्रक्रियेस अॅड. संजय महाजन यांनी प्रारंभ केला. त्यांना किरण अग्निहोत्री, किरण सोनवणी व विनायक महाजन यांनी सहकार्य केले.

अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने झालेल्या या लिलावात भाविक भक्तांनी मोठ्या चढाओढीने भाग घेतला. सर्वाधिक मानाच्या मारुतीच्या वाहनास दोन लाखांपर्यंत बोली लावण्यात आली. येथील रितेश मधुकर महाजन, रा. कळमसरे, ह.मु. जळगाव यांनी या वाहनास शेवटची बोली बोलून मानाचे वाहन घेतले. तसेच दुर्गादेवीच्या वाहनास देखील तशीच चढाओढ दिसून आली. रुद्र ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ८८,५०१/- रुपयांत मोठ्या चुरशीने भाग घेऊन बोली लावली.

सदर वाहनांचा लिलाव खालीलप्रमाणे:👇

  • - श्री गजाननाचे वाहन - यशवंत (आप्पा) अंबादास महाजन - २१,५०१/- रुपये
  • - हत्तीचे वाहन - कै. अनुसयाबाई भिवसन मराठे, मराठे ट्रेडिंग, भगवान शिवराम मराठे - ३६,००१/-
  • - सूर्याचे वाहन - कै. सखाराम गंगाराम महाजन यांच्या स्मरणार्थ, बापू सखाराम महाजन - २७,१११/- रुपये
  • - मोराचे वाहन - गुलाब पितांबर महाजन, दीपक महाजन, समाधान महाजन - २७,५०१/- रुपये
  • - शेषाचे वाहन - माऊली मंगल कार्यालय, संचालक भूपेंद्र पाटील - ४२,५११/-
  • - घोड्याचे वाहन - मॉर्निंग ग्रुप, भानुदास विसावे, जीवन आप्पा बयस - ३१,०११/-
  • - राजहंसाचे वाहन - जैन गल्ली मित्र परिवार, आकाश कुमार - २२,००१/- रुपये
  • - दुर्गादेवीचे वाहन - रुद्र ग्रुप, शशांक नगरिया, लकी काबरा - ८२,५५५/- रुपये
  • - मारुतीचे वाहन - रितेश मधुकर महाजन, ह.मु. जळगाव - २,०१,०००/- रुपये (दोन लाख एक हजार)
  • - चंद्राचे वाहन - जय भवानी मित्र मंडळ, लांडगे गल्ली - २६,१११/- रुपये
  • - गरुडाचे वाहन - स्वराज्य प्रतिष्ठान, मंदार सुरेश पाटील, केदार भाटिया - १०,१११/- रुपये
  • - अंगदाचे वाहन - मंगलदीप कन्स्ट्रक्शन, अमोल दिलीप पाटील - १३,५०१/- रुपये
  • - पांडवसभेचे वाहन - हॉटेल एकविरा, मोहन सुकदेव पाटील - जय हिंद व्यायाम शाळा - ३१,५११/- रुपये

याप्रमाणे बैलजोडीच्या जाहीर लिलावातून मंडळाला एकूण ५,७२,३२६/- रुपये मिळाले. मागील वर्षी सर्व वाहने ६,५८,७८६/- पर्यंत गेली होती, त्या अनुषंगाने यावर्षी ८१,९७०/- रुपयांची घट झाली म्हणजे उत्पन्नात घट निर्माण झाली. तर आठवडे बाजार लिलाव ३१,५०१/- रुपयांत गेला, मागील वर्षी सदर लिलाव २७,००१/- रुपयांत गेला होता, त्यात ४,५००/- रुपयांची वाढ झाली. 

सदर कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, मंदिर जीर्णोद्धार समितीचे प्रमुख जीवन आप्पा बयस, प्रशांत वाणी, किरण वाणी, विलास येवले, अशोक येवले, कान्हाशेठ भाटिया, ज्ञानेश्वर महाजन सह संचालक मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज