Top News

ज्युडो स्पर्धेत कृष्णा महाजनची बाजी; विभागीय स्तरासाठी निवड


धरणगाव
: क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव आणि प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेचे आयोजन प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे करण्यात आले.

या स्पर्धेत इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, धरणगाव येथील इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कृष्णा महाजन याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळविले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याची विभागीय स्तरावरील ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कृष्णाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डी. जी. पाटील व सचिव सी. के. पाटील यांनी संचालक अश्विनकुमार पाटील यांच्या उपस्थितीत त्याचे कौतुक केले. प्राचार्या सुरेखा पाटील, उपप्राचार्य ए. एस. पाटील, पर्यवेक्षिका भारती पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृष्णाचे अभिनंदन केले.

कृष्णाला महाविद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक डी. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कृष्णा महाजनचे महाविद्यालय तसेच क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज