Top News

नागभीड तालुक्यातील दोन ‘पराग’ जिल्ह्यावर; NJA मध्ये महत्त्वाची जबाबदारी

पराग भानारकर यांची जिल्हा सहसचिवपदी, तर पराग गुंडेवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

प्रतिनिधी संजय बागडे - नागभीड : न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन (NJA) च्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत नागभीड तालुक्यातील दोन पत्रकारांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. पराग भानारकर यांची जिल्हा सहसचिवपदी, तर पराग गुंडेवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे नागभीड तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून, दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना वाचा फोडण्यासाठी प्रभावीपणे कार्य केले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पराग भानारकर हे लेखक, कवी व शिक्षक असून, ते दैनिक सकाळचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. विविध सामाजिक व शैक्षणिक विषयांवर ते सातत्याने लेखन करीत असतात.

तर पराग गुंडेवार हे विदर्भ माझा न्यूज 24चे मुख्य संपादक असून, पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते एका ट्विंकल  इंग्लिश स्कूल, नागभीड  येथील शाळेत लिपिक म्हणूनही कार्यरत आहेत.

न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणे तसेच पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक उपक्रम राबविण्याची संधी या दोन्ही पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे.

दरम्यान, पराग भानारकर व पराग गुंडेवार यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज