Top News

राष्ट्रवादी काँग्रेस रिसोड शहर महिला अध्यक्षपदी सौ. वर्षा अमर कानडे यांची नियुक्ती

 


प्रतिनिधी अमर कानडे 

रिसोड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिसोड शहर महिला अध्यक्षपदी सौ. वर्षा अमर कानडे यांची नियुक्ती करण्यात आली. वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे व वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष मा. माधवी ताई झनक यांच्या हस्ते सौ. वर्षा अमर कानडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा ठाकरे यांनी, “सौ. वर्षा अमर कानडे या रिसोड शहरातील महिलांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच पक्षाची महिला संघटना मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील,” असा विश्वास व्यक्त केला.

रिसोड शहरातील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी तसेच महिला, सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी सौ. वर्षा अमर कानडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिसोड शहरातील महिला संघटनेला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सौ. वर्षा अमर कानडे म्हणाल्या, “पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. रिसोड शहरातील महिलांच्या अडचणी व प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून, महिलांना संघटित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार शहरातील महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार आहे.”

सौ. वर्षा अमर कानडे यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात रिसोड शहरातील महिला संघटनेला त्यांच्या नेतृत्वातून नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी नियोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष वाशिम चंद्रकांत दादा ठाकरे,व प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. माधवराव जाधव,जिल्हा प्रवक्ता गजाननराव आरु,भागवतराव गाभणे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष दौलत इंगोले पंजाबराव अवचार, शिंदे मामा जेष्ठ नेते येवती, बंडूभाऊ हाडे माजी पंचायत समिती सभापती,प्रमोद चौधरी युवक जिल्हाध्यक्ष,डॉ. विशाल भाऊ सोमटकर कृषी औद्योगिक संस्था सदस्य वाशिम ,ज्योतीताई काठोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महिला उपाध्यक्ष, तेजराव पाटील वानखडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष रिसोड, किरण ताई बदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका महिला अध्यक्ष रिसोड गोपाल भाऊ मगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष रिसोड जयवंतराव हिलोडे सर, श्रावण भाऊ जमदाडे, प्रदेश सचिव अल्ताफ भाई घनकर, प्रभाकर पाटील सरकटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष रिसोड, गोपाल मोरे युवक शहराध्यक्ष रिसोड, भारत गुंजकर महामंत्री रिसोड, गजानन भाऊ बाजड पत्रकार तथा रोजगार सेवक संघटना रिसोड तालुका अध्यक्ष, सदाशिव कांबळे, अविनाश सहातोंडे वकील साहेब, इरफान पठाण, अन्सार कुरेशी, आयन मुक्तार पठाण, फारुक शहा वाकत सर्कल अध्यक्ष, कदीर भाई अल्पसंख्यांक अध्यक्ष, रफिक भाई वाघे पंचायत समिती सरकार अध्यक्ष, विठ्ठल खरात करडा सर्कल अध्यक्ष, संजय खरात, अरुण पांढरे गोभणी जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष, तोफिक भाई रिसोड, आदी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज