Top News

वरोरा येथे झोपला मारोती देवस्थानतर्फे भव्य तान्हा पोळा उत्सव

प्रतिनिधी - संजय बागडे 

वरोरा : झोपला मारोती देवस्थान कमिटी, दत्त मंदिर वार्ड, वरोरा यांच्या वतीने बाल गोपालांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता झोपला मारोती देवस्थान, विवेकानंद शाळेमागे, वरोरा येथे होणार आहे.

पोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक सण आहे. लहान मुलांमध्ये भारतीय संस्कृती व परंपरांची जपणूक व्हावी, या उद्देशाने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी बाल गोपाल सजविलेल्या लाकडी नंदी बैलांसह उत्सवात सहभागी होणार आहेत.

उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून लक्की ड्रॉद्वारे १२ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच नंदी घेऊन येणाऱ्या प्रत्येक बाल गोपालाला टिफिन बॉक्स भेट देण्यात येणार आहे.

सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत नोंदणी करण्यात येणार असून, ३१२ नोंदणी पूर्ण होताच कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे.

वरोरा शहरातील सर्व बाल गोपालांनी पालकांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन तान्हा पोळा उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगर परिषद वरोरा बांधकाम सभापती तथा शिवसेना चंद्रपूर जिल्हा संघटक मनीष मुरली जेठानी यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज