![]() |
| शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पाटबंधारे विभागाकडे मागणी; रब्बी हंगामासाठी पाच आवर्तन जाहीर करण्याचीही मागणी. |
धरणगाव, प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यात गेल्या महिन्यापासून समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्याने शेतपिके करपण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, गुराढोरांनाही पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यात गिरणा नदीचे एक आवर्तन तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे करण्यात आली.
दि. ४ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी तसेच शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पाटबंधारे कार्यालयात उपअभियंता तुषार राजपूत यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतपिकांना मोठा फटका बसत आहे. पिके करपण्यास सुरुवात झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिस्थिती गंभीर होत चालली असून, पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतपिके व गुराढोरांसाठी गिरणेचे एक आवर्तन तातडीने सोडणे गरजेचे आहे.
तसेच आगामी रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाच आवर्तनांचे नियोजन जाहीर करावे, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे, नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, सुनील चौधरी, किरण अग्निहोत्री, जितेंद्र धनगर, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी, लिलाधर पाटील, नंदू पाटील, अरुण पाटील, गजानन महाजन, सुनील चव्हाण, प्रविण पाटील, अक्षय मुथा, रियाझ बागवान, वसीम पिंजारी, प्रेमराज चौधरी, मेघनाथ ठाकरे, राकेश चौधरी, अरविंद चौधरी, शरद शिरसाठ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

إرسال تعليق