Top News

अपघात ग्रस्तांवर नागपुरात मोफत उपचार व शस्त्रक्रिया.

अपघातग्रस्त आई-मुलासाठी धावले तनय दादा देशकर.

आवळगाव ता. ब्रह्मपुरी : गडचिरोली रोडवरील पोरला येथे आवळगाव येथील मुक्ता वाढणकर व त्यांचा मुलगा ऋषी वाढणकर यांचा दुचाकीने जात असताना अपघात झाला. मार जास्ती लागल्याने अपघातानंतर दोघांनाही जलद उपचारांची आवश्यकता होती. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने महागड्या उपचारांचा खर्च करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते.

याच परिस्थितीत जखमी मुक्ता वाढणकर व ऋषी वाढणकर यांच्या कुटुंबीयांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तनय दादा देशकर यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहिती देत आपल्या आर्थिक अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष तनय दादा देशकर यांनी तत्काळ पुढाकार घेत दोघांनाही नागपूर येथील नामांकित रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी पाठविले.

नागपूर येथे दोघांवर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. तसेच आवश्यक शस्त्रक्रियाही मोफत करण्यात आली. उपचाराच्या काळात नागपूर येथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष तनय दादा देशकर यांनी सहकार्य केले.

उपचारानंतर मुक्ता वाढणकर व ऋषी वाढणकर आवळगाव येथील आपल्या घरी परतल्यानंतर तनय दादा देशकर यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पुढील उपचारांची माहिती घेत त्यांच्या आरोग्याबाबतही काळजी व्यक्त केली. या भेटी दरम्यान भाजपा ब्रह्मपुरी तालुक्याचे उपाध्यक्ष श्री. रामदास उर्फ गोमाजी भोयर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री. साकेतजी भानरकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. अविनाशजी मस्के, भाजपा तालुका सचिव श्री. अभय कुथे, विद्यार्थी मोर्चाचे श्री. तेजस दोनाडकर, बूथ प्रमुख श्री. अमोल भोयर उपस्थित होते. 

अडचणीच्या काळात करता, कुटुंबाच्या मदतीला धावून जात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल वाढणकर कुटुंबीयांनी तनय दादा देशकर यांच्या प्रती समाधान व्यक्त केले आहे. 


Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज