![]() |
| अजय मुकिंदा जाधव |
महागाव (यवतमाळ) : घानमुक, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथील अजय मुकिंदा जाधव यांची महाराष्ट्र शासनाच्या Social Services Superintendent (Medical) या प्रतिष्ठित पदावर VJ-A प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
अजय जाधव यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी आई-वडिलांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शन, संस्कार आणि प्रोत्साहनामुळे हे यश संपादन करता आल्याचे जाधव यांनी सांगितले.
अजय जाधव यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी : सुरज सुधाकरराव पवार

إرسال تعليق