Top News

नागभीड ब्रम्हपुरी महामार्गावर भिषण अपघातात दोन ठार, सहा गंभीर

श्रावणी हिमेश बेदरे वय (12).रा. विरली(बुज) ता. लाखांदूर, जिल्हा -भंडारा.

चालक नितीन भर्रे वय (32), रा. बोन्डेगावं ता. ब्रम्हपुरी.

नागभीड तालुका प्रतिनिधी -संजय बागडे 

नागभीड वरून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या मारुती सुझुकी एसर्टिम  L. X. I. वाहन क्र. M. H. 31- C. D. 9189 ने प्रवास करीत होते. कोर्धा जवळील भोतमांगे धाब्यावर जेवण करून गाडीत बसून प्रवास करीत असता चालकास झपकी लागू नये म्हनुन कोर्धा गावाजवळ गाडी थांबविली असता भर्धावं वेगाने अज्ञात वाहणाने मागून जब्बर धडक दिल्याने चालक नितीन भर्रे  वय (32), रा. बोन्डेगावं ता. ब्रम्हपुरी., व श्रावणी हिमेश    बेदरे वय (12).रा. विरली(बुज) ता. लाखांदूर, जिल्हा -भंडारा. यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जन गंभीर जखमी झाले असून उपचार सुरु आहेत.

अपघात झाल्यावर अज्ञात वाहचालक घटना स्थळावरून वाहन घेऊन पसार झाला होता. परंतु c.c. t.v. फुटेजच्या आधारे काही तासात अज्ञात वाहणाचा शोध घेऊन चालकास ताब्यात घेतले आहे. जखमीच्या बयानवरून नागभीड पोलीस स्टेशन मध्ये अप. क्र. 309/2026,कलम 106(1),281,125(अ ), 125(ब ), भारतीय न्याय संहिता, सहकलम 184,134, 187 मो. वा. कां. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस उपविभागीय अधिकारी साहिल झारकर, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात स. पो. नी. दिलीप पोटभरे, पो उप नी. अजिंक्य गोविदलवार यांचे पथकने कार्यवाही केली. सदर गुन्हाचा तपास पो. उप. नी. अनिल डोंगरवार, पो. ह वा. राहुल लाखे हे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज