Top News

गिरगावात ६२ वर्षांची कुस्तीची परंपरा कायम; आखाड्यात रंगली कुस्तीची दंगल


गिरगाव : श्री बालमित्र नवयुवक मंडळ, गिरगाव तसेच विनोदभाऊ बोरकर मित्रपरिवार यांच्या सौजन्याने गिरगाव येथे मागील ६२ वर्षांपासून सुरू असलेली कुस्तीची दंगल (आखाडा) यंदाही उत्साहात पार पडली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या कुस्तीच्या आखाड्याला लहान मुलांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळीमेळीच्या वातावरणात विविध कुस्त्या रंगल्या. सहभागी मल्लांनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. विजेत्या स्पर्धकांना नारळ, बुक व पेन देऊन गौरविण्यात आले.

या पारंपरिक कुस्तीच्या आयोजनामुळे गिरगावातील जुन्या क्रीडा परंपरेला उजाळा मिळाला असून, नव्या पिढीमध्ये कुस्तीविषयी आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी विनोदभाऊ बोरकर, अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगाव तथा युवा नेते नागभीड; शरदराव सोनवणे, उपसभापती आदिवासी सोसायटी गिरगाव; गुरुदासजी चावरे, उपाध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगाव; यदुभाऊ गिरडकर, संचालक श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगाव; जगदीश पा. बोरकर, सदस्य ग्रामपंचायत गिरगाव; नबी शेख, अध्यक्ष ग्राम काँग्रेस कमिटी झाडबोरी; चेतन खोब्रागडे, युवा काँग्रेस कार्यकर्ते गिरगाव; तात्याजी गिरडकर, सुरेशजी मुंगमोडे, वनमाळी निकोडे, सदस्य ग्रामपंचायत गिरगाव; विनोद मुंगमोडे, युवा काँग्रेस कार्यकर्ते गिरगाव; सुखदेवजी पर्वते यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व गिरगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज