Top News

लिटल ब्लासम स्कूलमध्ये शिक्षकांचा झाला गौरव

सुनील चौधरी यांच्या हस्ते शिक्षकांना मानपत्र प्रदान

धरणगाव : येथील लिटल ब्लासम स्कूलमध्ये कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 35 शिक्षकांचा गौरव करण्यात आला. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक तथा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कदम साहेब, विधीज्ज्ञ सिद्धी चौधरी यांची तर मंचावर संस्थेच्या संचालिका तसलीम बोहरी, संचालक रमेश पाटील, गजानन साठे, प्राचार्य रेखा पवार, संस्थेचे अध्यक्ष दिपक जाधव यांची उपस्थिती होती. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दिपक जाधव, प्राचार्य रेखा पवार मॅडम यांच्या हस्ते अतिथींना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर संचालिका नाजनीन बोहरी यांनी रोपटे देऊन अतिथींचा सत्कार केला. यावेळी सुनील चौधरी यांच्या हस्ते 35 शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर 25 विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी एआय तंत्रज्ञानाच्या काळात शिक्षण क्षेत्रात भावभावना असलेल्या शिक्षकांचीच आवश्यकता राहणार असून शिक्षकांनी आव्हानांना सामोरे जाऊन विद्यार्थी घडवण्याचे कार्य तळमळीने करावे, असे मार्गदर्शन केले. पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर फक्त ज्ञानवर्धन व शैक्षणिक कार्यासाठी करावा, असे आवाहन केले. सुनील चौधरी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपून समाजात लौकिक मिळवावा. शिक्षकांनी फक्त शिक्षक न होता समाजशिक्षक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श ठेवावा, हे सांगितले. नाजनीन बोहरी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. या देशात समानता असल्याने एकमेकांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. थॅक्यू या शब्दाने आदर निर्माण होतो. जयहिंदचा नारा देशाविषयी अभिमान दर्शवतो तो बाळगला पाहिजे, आई वडील आणि गुरूजनांप्रती आदरभाव व्यक्त केला पाहिजे, असे सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन श्रद्धा अमित शिंदे व .चेतनापाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज