![]() |
| आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत बिनविषारी, विषारी सापांची माहिती , |
सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असतो : प्रदिप शेळके ( सचिव - वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव )
वृक्षारोपण करून धरती मातेचे ऋण फेडूया ! - निलेश चौधरी ( सदस्य - वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव )
धरणगाव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव व आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत बिनविषारी, विषारी सापांची माहिती , सर्पदंश प्रथमोपचार, सापाबद्दलची अंधश्रद्धा या संदर्भात विस्तृत कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एम बी मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव चे सचिव प्रदीप शेळके, सदस्य राजेश सोनवणे , हेमराज सपकाळे, सर्पमित्र निलेश चौधरी, रामलाल बोरसे, सर्पमित्र गणेश गुरव उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी हेमराज सपकाळे यांनी विषारी साप नाग, मण्यार, फुरसे यांची विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली. यानंतर राजेश सोनवणे यांनी बिनविषारी सापांची माहिती सांगून विद्यार्थ्यांना सापाबद्दलचे अंधश्रद्धा दूर केली. सर्पमित्र निलेश चौधरी, रामलाल बोरसे, गणेश गुरव यांनी प्रत्यक्ष सर्पाची विस्तृत माहिती सांगून सापाला वाचवणे हे आपले कर्तव्य आहे सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. वन्यजीव संस्थेचे सचिव प्रदीप शेळके यांनी चावल्यानंतर काय प्रथमोपचार घ्यावे यासंदर्भात विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती व डेमो दिला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांची सर्व उत्तरे देऊन शंकेचे निरसन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मैदानात सर्पमित्रांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.




إرسال تعليق