![]() |
| साहित्य कला मंचतर्फे धरणगावात बालकवी जयंती उत्साहात साजरी : |
धरणगाव (प्रतिनिधी)
निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे अद्ययावत, देखणे स्मारक प्रत्यक्ष साकार करुन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी साहित्यिकांचे ३६ वर्षांचे स्वप्नं साकार केले आहे असे प्रतिपादन साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. बालकवी जयंती निमित्त चोपडा रोडवरील नुतन स्मारक परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हे स्मारक पुढील शंभर वर्ष महाराष्ट्रातील बालकवी प्रेमींना व नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहिल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रारंभी राहूल जैन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुकेश तिवारी यांनी प्रास्ताविक करतांना स्मारक उभारणीत साहित्य कला मंचचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी विशेष परिश्रम घेणारे प्रा.बी.एन.चौधरी आणि डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या स्मारक ध्यासाचे जाहीर अभिनंदन केले. सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बालकवींच्या कवितांतील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली व स्मारक निर्मितीतील अडथळ्यांचा संदर्भ दिला. कमलेश तिवारी यांनी या निमित्ताने गावात एक प्रेक्षणीय वास्तूचे निर्माण होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कडूभाऊ महाजन यांनी संस्कृतीक ऊपक्रमांना या निमित्ताने चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. वासुदेव पाठक यांनी साहित्य कला मंचच्या कार्यक्रमांना उजाळा दिला. भुपेंद्र पाटील यांनी पार्वताबाई ठोमरे यांच्या आठवणी मांडल्या.
नवनिर्मित बालकवी स्मारकात १ आर्ट गॅलरी, १ लायब्ररी, १ सभागृह, बालकवी प्रतिमा, कार्यालय, कॅन्टीन, निवासी रुम, दर्शनी भागात २ भव्य व्यासपीठ असणार आहेत. बाह्य भागात गार्डन, ओपन थिएटर, काव्य उद्यान, औदुंबर, शोभेची शिल्प, वृक्ष असणार आहेत. या स्मारकासाठी विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे पाठबळ लाभले आहे.
या प्रसंगी वाय. डी. महाजन, धर्मराज मोरे, सुधाकर विसावे, विवेक लाड, लोकेश चौधरी, निलेश पाठक, भोजराज चौधरी, बारकू महाजन, सखाराम महाजन, दामोदर महाजन, बापू बडगुजर बालकवी प्रेमी, हेरिटेज वाॅक गृप, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पवार यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले.

إرسال تعليق