Top News

भारतीय स्वातंत्र्य दिन वाजत-गाजत, साजत थाटात संपन्न

भारत माता प्रतिमा पुजन करतांना मान्यवर 

साळवे, ता. धरणगाव : साळवे येथील साळवे इंग्रजी विद्यालय व साने गुरुजी प्राथमिक सेमी इंग्लिश विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीदरम्यान वि का सोसायटी व ग्रामपंचायतीच्या झेंडा चौकात ध्वजारोहण करण्यात आले. गावाच्या सरपंच सौ. आशा कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी सुंदर भाषणे सादर केली.

विविध स्पर्धा परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

ग्रामपंचायतीच्या झेंडा चौकात ध्वजारोहण करण्यात आले. 

या कार्यक्रमास ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळ, विविध सहकारी सोसायट्यांचे चेअरमन व सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, साळवे इंग्रजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ-श्रेष्ठ ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर. बोरोले यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ रंजना नेहेते यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात पार पडला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज