Top News

सिनेस्टाईल छापेमारीत कारला घेराव; ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली परिसरात मध्यरात्री पोलिसांनी सिनेस्टाईल छापेमारी करत एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहात अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित कार व दोन दुचाकींना घेराव घातला.

कारवाईदरम्यान रईस हारुन देशमुख, तौसिफ सैय्यद आरिफ आणि कृणाल उर्फ लकी रमेश पाटील यांना वाहनांमध्ये बसलेले असताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १६.११ ग्रॅम एमडी ड्रग्स, एक कार, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत मुख्य एमडी ड्रग्स पुरवठादारांची नावे समोर आली असून, जळगावातील अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज