Top News

📰 सुप्रसिद्ध पत्रकार सुरज पवार संपादित ‘वसंत गीतांजली’ कवितासंग्रहाचे लवकरच प्रकाशन

 वसंत गीतांजली काव्यसंग्रह 

प्रतिनिधी – सुरज पवार 

यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यातील सेलू (पोस्ट) येथे जन्मलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव परशुराम पवार लिखित ‘वसंत गीतांजली’ हा कवितासंग्रह लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. हा कवितासंग्रह माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित असून, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध पत्रकार सुरज सुधाकरराव पवार यांनी संपादित केला आहे.

या भव्य प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संपादक सुरज पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई येथे होणाऱ्या या सोहळ्यात साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज एकत्र येणार असून, ‘वसंत गीतांजली’ या कवितासंग्रहाबद्दल साहित्य वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज