यवतमाळ | प्रतिनिधी
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा वारसा पुढे नेत राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे समाजाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. मुंबई मंत्रालयात पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीनंतर बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांनी काहीच भाष्य केले नाही, अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर काही कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत आहेत.
मात्र या संदर्भात समाजातील काही जाणकारांनी स्पष्ट केले की, कॅबिनेट बैठकीत केवळ कॅबिनेट मंत्र्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते. सध्या इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांना त्या बैठकीत बोलण्याची संधी नव्हती, ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.
तसेच सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांच्या परंपरेतील वारसदार म्हणून इंद्रनील नाईक हे समाजाच्या प्रश्नांवर सतत चिंतन व मनन करत असतात. त्यामुळे त्यांच्या विषयी चुकीचे संदेश समाजात पसरवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती पत्रकार सुरज सुधाकरराव पवार (सनातन सारथी न्यूज, यवतमाळ) यांनी दिली असून, त्यांनी समाजातील कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा व वस्तुस्थिती समजून घ्यावी, असेही नमूद केले आहे.
إرسال تعليق