Top News

पाळधी खु मध्ये जागतिक वृक्षारोपण दिन साजरा; काशी पंढरी नगरात पिंपळाचे वृक्ष रोपण.

पाळधी खु | ५ जून २०२५
जागतिक वृक्षारोपण दिनाचे औचित्य साधून पाळधी खु येथील काशी पंढरी नगर परिसरात ओपन स्पेस मैदानात पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्वाचा संदेश देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन पाळधीचे प्रसिद्ध उद्योगपती दिलीपबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "आपल्या परिसराचे सौंदर्य आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे."

कार्यक्रमाला देवाकुमार कापुरे (आप्पा), ग्रामपंचायत सदस्य दिगंबर माळी, बुधा महाजन, पंकज महाजन, अशोक पाटील, मयूर ठाकूर, हिम्मत कुंभार आणि गटलू भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पिंपळ वृक्षाच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे विशेष कौतुक केले. परिसरातील तरुणांनी देखील या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज