Top News

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

नि:शुल्क समुपदेशन केंद्राची स्थापना- प्र.प्राचार्य एम ए मराठे

धरणगाव : येथील क्रांतीकारी खाज्याजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रवेश सत्र ऑगस्ट, २०२५ साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला दि.१५ मे, पासून सुरुवात झाली आहे. शासकीय आयटीआय प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रक्रिया समजुन घेण्यासाठी संस्थेत प्रवेश समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आाहेत. दोन वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विजतंत्री-२०, फिटर-२० जागा आहेत. तसेच, एकवर्षीय अभ्यासक्रमात मेकॅनिक डिझेल-४८, कोपा-४८, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक-२०, ड्रेस मेकिंग-२०, कॉस्मोटोलॉजी-२४ अश्या एकूण २०० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. 

सदरील प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे व इतर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सदर अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जून, २०२५ सायं. ५ वाजेपावेतो असणार आहे. प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १४ वर्षे व कमाल वयोमर्यादा नाही. वरील नमूद प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI) प्राचार्य नवनीत चव्हाण व प्र.प्राचार्य एम ए मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधावा.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज