Top News

माणुसकीचा महान आदर्श: श्री. गुलाबरावजी पाटील यांची सहृदय मदत.


बिलवाडी (ता. जळगाव):
"माणुसकी असावी अंतरी, दया, करुणा सदा ठायी ठायी", या ओळी जणू बिलवाडी गावातील एका वास्तव घटनेला साजेश्या ठरतात. गावातील चि. भरत वाघ या बालकावर अचानक वडीलांच्या दुर्दैवी मृत्यूचे संकट ओढावले. ज्या वयात बापाचे मायेचे छत्र मिळायला हवे, त्या वयातच भरतच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले. त्यातच घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने भरतच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला.

या परिस्थितीत गावातील काही सहृदय नागरिकांनी पुढाकार घेत, भरतला समाजातील आधार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भरतला ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्याकडे काळजीपूर्वक आणले. समाजसेवेची जाणीव ठेवणारे गुलाबरावजी पाटील साहेब यांनी या चिमुकल्याची जबाबदारी आपल्यावर घेतली. केवळ शिक्षणाचीच नव्हे तर राहण्याची देखील संपूर्ण सोय त्यांनी पाळधीत करून दिली.

राजकारण हे नेहमी सुरूच राहते, पण राजकारण करताना सामाजिक भान जपणे सर्वांनाच जमत नाही. मात्र ना. गुलाबरावजी पाटील हे या माणुसकीच्या कार्यातून समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत आहेत. त्यांच्या या सहृदयतेचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज