Top News

राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविणाऱ्या रुद्राक्ष महाजनचा सत्कार



धरणगाव : नवसारी येथे झालेल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत धरणगाव येथील प्रवक्ता अकॅडमीचा विद्यार्थी चि. रुद्राक्ष संतोष महाजन याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रुद्राक्ष हा शेतकरी कुटुंबातील असून, त्याचे वडील संतोष महाजन सामाजिक कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून त्याने धरणगावसह माळी समाजाचा गौरव वाढविला. या स्पर्धेत त्याला एलईडी टीव्ही स्क्रीनसह पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या वेळी माळी समाजाचे अध्यक्ष वि. टी. माळी सर, प्रवक्ता अकॅडमीचे संचालक शशिकांत महाजन, विभागीय अध्यक्ष विनायक महाजन, तालुकाध्यक्ष दिनेश महाजन, योगेश महाजन, किरण माळी, भूषण महाजन, गजानन महाजन तसेच परिसरातील समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माळी समाजाचे माजी सचिव गोपाल महाजन यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज