वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न द्या; नाईक-कारभाऱ्यांना मानधन लागू करण्याची मागणी
महागाव, प्रतिनिधी : महागाव येथील तांडा वस्तीवर तांडा नाईक हिरासिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नाईक व कारभारी यांची विशेष बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक जगदीश महाराज यांनी केले.
या बैठकीत माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, तांडा समृद्धी योजना प्रभावीपणे राबवावी, वसंत प्रेरणा पुरस्कारासाठी नामांकन पाठवावे तसेच नाईक-कारभारी यांना शासनाकडून दरमहा मानधन सुरू करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
तांडा नाईक हिरासिंग चव्हाण यांनी सांगितले की, समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन स्व. वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाईक-कारभारी यांना पूर्वीप्रमाणे मानसन्मान मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली.
प्रमुख पाहुणे समाजसेवक सुरज सुधाकरराव पवार यांनी नाईक-कारभारी यांना मानधनाचा लाभ मिळवून देण्यासाठी मंत्री संजय भाऊ राठोड व इंद्रनील भाऊ नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे सांगितले. तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळवून देण्यासाठी समाजबांधवांनी एकजुटीने संघटित होण्याचे आवाहन केले.
या बैठकीस रामलाल चव्हाण, सुरेश राठोड, भीमराव पवार, गंभीर चव्हाण, तोळाराम राठोड, रामदास राठोड, सवई राम चव्हाण, रामचंद्र जाधव, अरुण राठोड, उत्तम राठोड, संजय पवार, वरीलाल पवार, राजू सिंग, काळूराम राठोड, उल्हास गोपा पवार, राजेंद्र पवार, प्रकाश पवार, गेमा जाधव, अविनाश जाधव, बन्सी राठोड, शिवा राठोड, गुलाब जाधव, दिलीप राठोड, अविनाश आडे, मुकुंद जाधव, दामोदर पवार, सुरेश आडे, अनिल राठोड, सुधाकर चव्हाण, मनोज राठोड, गजानन जाधव, विनोद पिराजी राठोड यांच्यासह महागाव तालुक्यातील नाईक, कारभारी व बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा