Top News

चोपड्यात कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

 

धनवाडी शिवारातील पत्री शेडमधील गोदामात कारवाई; आरोपीला अटक

चोपडा (जळगाव) : चोपडा शहरातील धनवाडी रस्त्यावरील धनवाडी शिवारात सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर चोपडा शहर पोलिसांनी २७ ऑक्टोबरला कारवाई केली. या प्रकरणी जगन्नाथ जानकीराम महाजन (वय ५६ वर्षे, रा. पाटील गढी, चोपडा) याच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धनवाडी शिवारातील शेत गट क्रमांक १२५ मधील पत्री शेडच्या गोदामात ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तेथे देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई चंदन विष्णू पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४३८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
सनातन सारथी न्युज
सनातन सारथी न्युज